मुंबई – काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतांना माझ्या आणि माझे पती तथा या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या विरोधात काश्मीरमध्ये फतवा निघाला होता, असा धक्कादायक खुलासा या चित्रपटाच्या निर्मात्या तथा अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी येथे एका मुलाखतीच्या वेळी केला.
जोशी पुढे म्हणाल्या, ‘‘या चित्रपटामुळे सध्या सर्वत्र विवेक अग्निहोत्री यांचे कौतुक होत आहे; पण ‘द कश्मीर फाइल्स’सारखा गंभीर चित्रपट बनवणे सोपे नव्हते. हा चित्रपट पूर्ण व्हायला ४ वर्षे लागली. विवेक अग्निहोत्री यांना ‘द कश्मीर फाइल्स’ मुळे इतक्या धमक्या मिळत होत्या की, त्यांनी त्याचे ट्विटर खाते बंद केले होते. सततच्या धमक्यांमुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते.’’