‘डोळे येणे’ या विकारावर घरगुती उपचार

26

डोळे बरे होईपर्यंत नेहमीचा आहार न घेता मुगाच्‍या डाळीचे वरण आणि भात, मुगाच्‍या डाळीचे कढण (डाळ शिजवून तिच्‍यात चवीपुरता गूळ आणि मीठ घालून बनवलेला पातळ पदार्थ), रव्‍याचा उपमा किंवा शिरा, लापशी, मूगडाळ घालून बनवलेली तांदळाची खिचडी, भाकरी यांसारखा पचायला हलका आहार घ्‍यावा.

डोळे येणे, हा एक डोळ्‍यांचा संसर्गजन्‍य आजार आहे. यामध्‍ये डोळ्‍यातून चिकट स्राव येऊन डोळे लाल होतात. या आजाराला ‘कन्‍जक्‍टिवायटिस’ (conjunctivitis) किंवा ‘रेड आईज्’ (red eyes) अथवा ‘सोर आईज्’ (sore eyes) असे म्‍हणतात. हा आजार सामान्‍यतः ‘बॅक्‍टेरियल’ (जीवाणू) किंवा ‘व्‍हायरल’ (संसर्ग) असतो; पण सध्‍या साथीच्‍या स्‍वरूपातील हा आजार ‘व्‍हायरल’ स्‍वरूपाचा आहे, जो ‘अ‍ॅडेनोव्‍हायरस’ (Adenovirus) या विषाणूमुळे होतो. या विषाणूमुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, क्‍वचित् प्रसंगी ताप येऊ शकतो.

२ – २ चिमूट त्रिफळा चूर्ण दिवसातून ४ – ५ वेळा चघळून खावे. डोळ्‍यांची आग होत असल्‍यास झोपतांना डोळे बंद करून काकडीच्‍या चकत्‍या कापून त्‍या स्‍वच्‍छ धुतलेल्‍या रुमालाने डोळ्‍यांवर बांधाव्‍यात. काकडीप्रमाणे शेवग्‍याची वाटलेली पानेही डोळ्‍यांवर बांधता येतात.

डोळ्‍यांना लावलेले हात इतरत्र लावू नयेत. डोळ्‍यांना हात लावण्‍यापूर्वी आणि लावल्‍यानंतर हात साबणाने स्‍वच्‍छ धुवावेत.

हा आजार बिलकुल गंभीर नाही; परंतु योग्‍य काळजी न घेतल्‍यास किंवा दुर्लक्ष केल्‍यास, तसेच औषध उपचार न केल्‍यास या आजाराचे उपद्रव निर्माण होतात आणि मग हा आजार गंभीर स्‍वरूपात निर्माण होतो. यथायोग्‍य उपचार घेतल्‍यास हा आजार साधारणतः ३ ते ७ दिवसांमध्‍ये पूर्ण बरा होतो.

चिमूटभर भीमसेनी कापूर हातांच्‍या तळव्‍यांच्‍या मध्‍ये चोळावा आणि हाताचे तळवे डोळे उघडे ठेवून डोळ्‍यांच्‍या समोर जवळ धरावेत. तळवे डोळ्‍यांना टेकवू नयेत. या उपायाने डोळ्‍यांची जळजळ लगेच न्‍यून होते.

डोळे आले असतांना शक्‍यतो इतरांच्‍या संपर्कात येणे टाळावे. याने साथीचा प्रतिबंध होण्‍यास साहाय्‍य होते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम