रशियाकडून युक्रेनच्या केंद्रीय रेल्वे स्थानकावर आक्रमण

3

कीव (युक्रेन) – रशिया-युक्रेन युद्धाच्या आठव्या दिवशी रशियाच्या सैन्याने  युक्रेनच्या केंद्रीय रेल्वे स्थानकावर क्षेपणास्त्रे डागून रेल्वे स्थानक उडवून दिले. रशियन सैन्याने खेर्सोन शहरावरही नियंत्रण मिळवले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांच्या कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध करून ‘लढाई अजूनही चालू आहे’, असे म्हटले आहे.

युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने रशियाला साहाय्य करणार्‍या बेलारूसवरही कठोर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’ने म्हटले आहे की, रशिया आणि बेलारूस यांच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये लढाऊ विमाने, सैनिकांच्या वाहनांचे सुटे भाग आदींचा समावेश आहे.