Pavel Durov’s arrest
Pavel Durov’s arrest

पॅरिस (फ्रान्‍स) – ‘टेलिग्राम’ (Telegram) अ‍ॅपचे संस्‍थापक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव (Pavel Durov) यांना येथील बोर्जेट विमानतळावर अटक करण्‍यात आली. पोलिसांच्‍या म्‍हणण्‍यानुसार टेलिग्रामवर गुन्‍हेगारी कृत्‍ये बिनदिक्‍कतपणे चालू ठेवण्‍यास अनुमती देण्‍यावरून ही कारवाई करण्‍यात आली. सध्‍या या प्रकरणी टेलिग्रामकडून कोणतीही प्रतिक्रिया व्‍यक्‍त केलेली नाही. या प्रकरणी फ्रान्‍सच्‍या गृहमंत्रालयाने निवेदन प्रसारित केलेले नाही. रशियाच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाने प्रश्‍न केला आहे की, ‘पाश्‍चात्‍य स्‍वयंसेवी संस्‍था डुरोव यांच्‍या सुटकेची मागणी करतील का ?’ पावेल डुराव रशियात जन्‍मलेले असून त्‍यांच्‍याकडे रशियासह फ्रान्‍स (France) आणि अन्‍य काही देशांचे नागरिकत्‍व आहे.

पॅरिसमध्‍ये वर्ष २०१५ मध्‍ये इस्‍लामिक स्‍टेटने(Islamic State) जिहादी आतंकवाद्यांना संदेश पाठवण्‍यासाठी टेलिग्रामचा वापर केला होता. यावर विचारलेल्‍या प्रश्‍नाला उत्तर देतांना पावेल म्‍हणाले होते की, मला वाटते की, आतंकवादासारख्‍या वाईट घटनांच्‍या भीतीपेक्षा गोपनीयतेचा अधिकार महत्त्वाचा आहे