मंगळ ग्रहावरील अमेरिकेच्‍या यानाद्वारे (Perseverance Rover) प्राणवायूची (oxygen) निर्मिती.

0

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्‍था ‘नासा’ने मंगळ ग्रहावर पाठवलेल्‍या ‘पर्सीवरेंस’ या ‘रोव्‍हर’वर (Perseverance Rover) लावण्‍यात आलेल्‍या एका उपकरणाद्वारे प्राणवायूची (ऑक्सिजनची) निर्मिती करण्‍यात यश मिळवले आहे. या उपकरणाचे नाव ‘मॉस्‍की’ आहे. एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत या उपकरणाने १२२ ग्रॅम ऑक्‍सिजन निर्माण केले आहे. याद्वारे एखादी व्‍यक्‍ती मंगळावर ३ घंटे ४० मिनिट जिवंत राहू शकते. ‘अशा प्रकारे प्राणवायू निर्माण करण्‍याचा लाभ भविष्‍यात होऊ शकतो’, असे तज्ञांनी म्‍हटले आहे.

या उपकरणाने आतापर्यंत १६ वेळा प्राणवायूची निर्मिती केली आहे. नासाच्‍या म्‍हणण्‍यानुसार हे उपकरण प्रत्‍येक घंट्याला १२ ग्रॅम प्राणवायू निर्माण करू शकतो आणि याची शुद्धता ९८ टक्‍के इतकी आहे.