विरोधी पक्षांच्‍या ‘इंडिया’ आघाडीकडून देशातील वृत्तवाहिन्‍यांच्‍या १४ पत्रकारांवर बहिष्‍कार घालण्‍यात आला आहे.

आघाडीने त्‍यांची सूची प्रसारित करतांना म्‍हटले, ‘द्वेषपूर्ण चर्चासत्र चालवणार्‍या या सूत्रसंचालकांच्‍या कार्यक्रमांवर बहिष्‍कार घालण्‍याचा आम्‍ही निर्णय घेतला आहे.’ याविषयी ‘न्‍यूज ब्रॉडकास्‍टर्स अँड डिजिटल असोसिएशन’ने निषेध केला.