शहरातील मेट्रो कार्यान्वित होण्यासाठीचा २०२० चा मुहूर्त कोव्हिड-१९च्या प्रादुर्भावामुळे पुढे गेला असला, तरी पुढील वर्षी जून आणि ऑगस्टमध्ये पिंपरीसह पुण्यातील प्रवाशांना मेट्रोतून सफर करायला मिळणार आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने सुरुवातीला केलेल्या नियोजनानुसार पुणे आणि पिंपरीतील प्राधान्य मार्गांवर प्रत्येकी दोन स्टेशन कार्यान्वित केली जाणार होती. या नियोजनात बदल करून आता प्राधान्य मार्गांवरील सर्व स्टेशन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे संकेत ‘महामेट्रो’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे संत तुकारामगर ते फुगेवाडीऐवजी आता पिंपरीतील नागरिकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेपासून दापोडीपर्यंतचा प्रवास पुढील वर्षीपर्यंत करणे शक्य होणार आहे; तसेच पुण्यातील नागरिकांनाही आनंदनगर ते गरवारे कॉलेजऐवजी वनाझपासून गरवारे कॉलेजपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.

संपूर्ण बातमी – महाराष्ट्र टाईम्स