वर्ष २०२४ च्या आत भव्य श्रीराममंदिर उभे करण्याचा आमचा प्रयत्न ! – प.पू. गोविंददेव गिरी महाराज

170

पुणे – वर्ष २०२४ च्या आत भव्य, सुरक्षित आणि १ सहस्र वर्षापर्यंत टिकणारे श्रीराममंदिर उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. घाई करून मंदिराच्या दर्जामध्ये फरक पडू देणार नाही. यासाठी तज्ञ आर्किटेक्टकडून आराखडे मागवणार आहोत. सध्या कोषामध्ये ७८ कोटी रुपये आहेत. त्यातील २४ कोटी रुपये आम्ही ‘लार्सन अँड टुब्रो’ला देणार आहोत. कोषामध्ये रक्कम सातत्याने वाढत आहे, अशी माहिती रामजन्मभूमी मंदिर निर्मिती न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य किशोरजी व्यास म्हणजेच प.पू. गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली. ते पुण्यामध्ये बोलत होते. राज्यात मंदिरे खुली करण्याच्या प्रश्‍नावर ‘देव सर्वांना सुबुद्धी देवो’ असे उत्तर त्यांनी दिले.

१५ जानेवारी ते फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत देशातील ११ कोटी लोकांपर्यंत पोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. १०० आणि १० रुपये ‘कुपन’च्या माध्यमातून निधी संकलनाचे कार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.