तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com
Home Educational पदविका Diploma संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 20 दिवस दिवाळी सुट्टी.

पदविका Diploma संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 20 दिवस दिवाळी सुट्टी.

129
तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com
तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com

पुणे – राज्यातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित तत्वावर चालणारी तंत्रनिकेतने व इतर पदविका संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 11 ते 30 नोव्हेंबरपर्यंत एकूण 20 दिवसांची हिवाळी सुट्टी देण्यात येत असल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले.

मात्र, पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी, मंडळस्तरावरील कामकाज व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेसाठी लागणारा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही सुट्टी नसेल. तसेच प्रवेशप्रक्रियेच्या तातडीच्या व महत्त्वाच्या कामासाठी ज्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना थांबविण्यात येईल, ते सुरळीत कामे होतील.

त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून या कालावधीत कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा कामचुकारपणा दिसून आल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे डॉ. वाघ यांनी स्पष्ट केले.

तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com