News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

अयोध्या – अयोध्येच्या श्रीराममंदिरात विराजमान असलेल्या श्री रामलल्लाला प्रतिदिन सूर्यतिलक लावला जाईल. सूर्यतिलक येत्या रामनवमीपासून म्हणजे ६ एप्रिलपासून चालू होईल. मंदिर बांधकाम समितीने हा निर्णय घेतला आहे. ‘सूर्यतिलक’ म्हणजे मूर्तीच्या कपाळावर सूर्याचे कीरण पडणे होय. अयोध्येतील श्रीराममंदिरामध्ये विशिष्ट आरसे आणि अन्य उपकरण यांचा वापर करून श्री रामलल्याच्या मूर्तीच्या कपाळावर सूर्याची किरणे पडण्यासाठी एक विशेष यंत्रणा सिद्ध केली आहे.

श्री रामलल्लाच्या कपाळावर सुमारे ३-४ मिनिटे सूर्यकिरणे पडतील. समितीचे अध्यक्ष आणि माजी प्रशासकीय अधिकारी नृपेंद्र मिश्रा म्हणाले, ‘‘सूर्यतिलकाच्या प्रत्येक दिवसाचे नियोजन पुढील २० वर्षांसाठी केले गेले आहे. गेल्या वर्षी रामनवमीच्या दिवशी म्हणजे १७ एप्रिल २०२४ या दिवशी श्री रामलल्लाचा सूर्यकिरणांनी राजतिलक झाला होता.