Seven phase election program announced by Election Commission
Seven phase election program announced by Election Commission

देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील मतदान कार्यक्रम आज जाहीर केला. १९ एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले, देशात लोकसभा निवडणूक ५४३ जागांवर निवडणूक होणार आहे. सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे.

ठळकन्यूज व्हाटस्अप ग्रुप मध्ये क्लिक करून शामिल  व्हा  !

19 एप्रिलपासून सुरू होणारे आणि 1 जून रोजी संपणाऱ्या 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. एकाचवेळी मतदान होणार नाही, असे ते म्हणाले. आंध्र प्रदेशात १३ मे रोजी, सिक्कीममध्ये १९ एप्रिलला, अरुणाचल प्रदेशात १९ एप्रिलला आणि ओडिशामध्ये १३ मे रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

सात टप्प्यात निवडणूक होणार

फेज १ – १९ एप्रिल
फेज २ – २६ एप्रिल
फेज ३ – ७ मे
फेज ४ – १३ मे
फेज ५ – २० मे
फेज ६ -२५ मे
फेज ७ – १ जून

अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगड, दादरा नगर हवेली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड इ. एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल.

कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर, छत्तीसगड, आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंडमध्ये चार टप्प्यांत तर महाराष्ट्र, जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे या दरम्यान लोकसभ निवडणुका पार पडणार आहे
पहिला टप्पा – रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर – १९ एप्रिल रोजी मतदान
दूसरा टप्पा – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी – २६ एप्रिल रोजी मतदान
तिसरा टप्पा – रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले – ७ मे रोजी मतदान
चौथा टप्पा – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड – १३ मे रोजी मतदान
पाचवा टप्पा – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, (मुंबईतल्या 6 जागा) – २० मे रोजी मतदान