सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी २ वैद्यकीय अधिकारी निलंबित

65

यवतमाळ, ६ फेब्रुवारी – येथे पोलिओ डोसाच्या ऐवजी बालकांना सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या चौकशीनंतर डॉ. भूषण मेश्राम आणि डॉ. महेश मनवर या वैद्यकीय अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणी ३ कंत्राटी कर्मचार्‍यांना शिस्तभंगाची कारवाई करत आधीच बडतर्फ केले आहे