महावितरणला (Mahavitran) चार्जिंगसाठी सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पुरस्कार.

4

‘ईव्ही चार्ज इंडिया २०२३’ या नवी दिल्ली येथे आयोजित इलेक्ट्रिक वाहनांविषयीच्या परिषदेत महावितरणला चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांच्या विकासात सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स (एसएमईव्ही) या संस्थेचे महासचिव श्री. अजय शर्मा यांच्या हस्ते महावितरणचे संचालक मा. प्रसाद रेशमे यांनी महावितरणतर्फे पुरस्कार स्वीकारला.