पितांबरीचे मार्केटिंग डायरेक्टर परीक्षित प्रभुदेसाई यांना ‘युवा उद्योजक’ सन्मान प्राप्त !

63

ठाणे – विविध क्षेत्रांत दैदिप्यमान कामगिरी करणार्‍या कर्तृत्ववान युवा व्यक्तींना ‘झी युवा’ वाहिनीच्या वतीने प्रतिवर्षी सन्मान सोहळ्यात सन्मानित केले जाते. कोरोनाच्या संकटकाळात सतत कार्यरत राहून सामाजिक दायित्व पार पाडल्याने यंदा पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.चे मार्केटिंग डायरेक्टर आणि व्हाईस चेअरमन श्री. परीक्षित प्रभुदेसाई यांना ‘युवा उद्योजक’ सन्मान देऊन गौरवण्यात आले. अभिनेत्री सौ. किशोरी शहाणे विज आणि कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्सच्या श्रीमती प्रियांका मेवाणी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात सर्वसामान्यांची आरोग्य सुरक्षा लक्षात घेऊन परीक्षित प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली पितांबरी ‘शुअरक्लिन हँड सॅनिटायझर’, ‘शुअरगार्ड मास्क’ अशी अभिनव उत्पादने आणि स्वयंरोजगारासाठी पूरक ‘पितांबरी फ्रँजायसी’ आणि ‘पितांबरी ग्राहक मंच’ अशा योजना पितांबरीने चालू केल्या.

‘पितांबरीने नुकतीच ३० वर्षे पूर्ण केली असल्याने हा एक युवा ब्रँड आहे. या पुरस्कारांचे श्रेय माझ्या समवेत पितांबरीच्या सर्व सहकार्‍यांचेही आहे’, असे परीक्षित प्रभुदेसाई यांनी सांगितले. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील १७ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला.