मुंबई: कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना 12 ते 16 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे या कालावधीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद राहणार आहे.

(maharashtra education department declares diwali vacation for school)


राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा राज्यात शाळा सुरु करण्यात आल्या नव्हत्या. त्यावर पर्याय म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यास सांगण्यात आले होते.