शिर्डी – साई संस्थानने शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांना ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी साईभक्तांनी दर्शनाला येण्याआधी संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक असेल.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून निघाल्यानंतर आणि साई मंदिरात दर्शन घेईपर्यंत काही अप्रिय घटना घडल्यास संबंधित भक्त किंवा त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.
नोंदणी प्रक्रियेच्या माध्यमातून भक्तांची ओळख पटवणे सोपे होणार असून, नोंदणी केलेल्या भक्तांसाठीच हा विमा लागू होणार आहे.






