दहावी बारावी 17 नंबर फॉर्म प्रक्रिया 2 नोव्हेंबर पासून.

60

फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये होणाऱया दहावी, बारावीच्या परीक्षेचा 17 नंबरचा (खासगी विद्यार्थी) अर्ज भरण्याची प्रक्रिया 2 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 28 नोव्हेंबरपर्यत विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज व परीक्षा फी आनलाइन भरता येणार आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला न मिळाल्यास प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो ऑनलाइन अर्ज भरताना अपलोड करावा. तसेच पुढील संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अर्जात नमूद करावा, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केल्या आहेत.

ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी 020-25705207/08 किंवा 25705271 या क्रमांकावर संपर्प साधावा असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.

परीक्षाअर्ज भरण्यासाठी वेबसाईट

दहावी- http://form17.mh-ssc.ac.in
बारावी-http://form17.mh-hsc.ac.in