image from https://wallpaperaccess.com/

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने निर्माते असित कुमार मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्याबाबत मुंबई पोलिसांनी आता एक निवेदन जारी केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून लवकरच संबंधितांचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. “तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या अभिनेत्रीने एका निर्मात्याविरुद्ध लैंगिक छळाचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनुसार, निर्माता असित मोदी आणि काही क्रू मेंबर्सनी तिचा लैंगिक छळ केला. मात्र, अद्याप एफआयआर नोंदवणे बाकी आहे. आम्ही चौकशी सुरू केली असून लवकरच या प्रकरणाशी संबंधित लोकांचे जबाब नोंदवले जातील, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.

कालच लोकप्रिय सिटकॉममध्ये श्रीमती रोशन सोधी यांची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने मोदींवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तिने असित मोदी, प्रकल्प प्रमुख सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतीन बजाज यांच्याविरुद्ध कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्याची तक्रार दाखल केली. तिने शो सोडल्याचा खुलासाही अभिनेत्रीने केला आहे. “असित मोदीने यापूर्वी अनेकदा माझ्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. सुरुवातीला, काम गमावण्याच्या भीतीने मी त्यांच्या सर्व विधानांकडे दुर्लक्ष केले. पण आता पुरे झाले मी आता ते घेणार नाही,” जेनिफरने ई-टाइम्सला सांगितले. नंतर, असित मोदींनी जेनिफरच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. त्यांच्या अधिकृत निवेदनात मोदींनी हे आरोप ‘निराधार’ असल्याचे म्हटले आणि त्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. “ती माझी आणि शो दोघांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याने आम्ही कायदेशीर कारवाई करू. आम्ही तिच्या सेवा बंद केल्यापासून, ती हे निराधार आरोप करत आहे,” तो म्हणाला.