महाराष्ट्रात पुन्हा नव्या कोरोना व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढला आहे. यापूर्वी जेएन १ व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली होती, आता केपी २ व्हेरियंट जगभरात आणि देशात पसरू लागला आहे. केपी २ व्हेरियंटने राज्यातही फैलाव केला आहे. महाराष्ट्रात कोविड- १९ उप- प्रकारचे ९१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हे कोव्हिड १९ ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट केपी. २ आहे. देशभरात या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यामध्ये केपी २ कोरोना व्हेरियंटचे ५१ रुग्ण आढळून आलेत, तर ठाण्यामध्ये २० रुग्ण तसेच उर्वरित महाराष्ट्रात २० रुग्ण आढळले आहे.
या व्हेरियंटचा पहिला रुग्ण जगात जानेवारी महिन्यात अमेरिकेत आढळला होता. महाराष्ट्राचे जीनोम सिक्वेन्सिंग को-ऑर्डिनेटर डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल आणि मार्च महिन्यामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या राज्यात दिसून आली होती. पण, लोकांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्याचे प्रमाण खूप कमी आहे.
सोलापूरमध्ये दोन, अहमदनगर, नाशिक, लातूर आणि सांगलीमध्ये प्रत्योकी एक रुग्ण आढळून आला आहे.