दिल्लीत शनि मंदिर पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न : हिंदूंचा विरोध !

18

नवी दिल्ली – पूर्व दिल्लीतील मांडवली येथील शनि मंदिराचा ढाचा पाडण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांना हिंदूंनी जोरदार विरोध केला. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले लोक आणि सुरक्षादलाचे सैनिक यांच्यात झटापटही झाली. हे मंदिर वर्षभरापूर्वी झाडाखाली बांधल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मोठ्या संख्येने लोकांनी मंदिराच्या ठिकाणी पोचून मंदिर हटवण्यास विरोध दर्शवला आहे.

पूर्व देहलीतील मांडवली येथील शनि मंदिराचा ढाचा पाडण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांना हिंदूंनी जोरदार विरोध केला. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले लोक आणि सुरक्षादलाचे सैनिक यांच्यात झटापटही झाली. हे मंदिर वर्षभरापूर्वी झाडाखाली बांधल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मोठ्या संख्येने लोकांनी मंदिराच्या ठिकाणी पोचून मंदिर हटवण्यास विरोध दर्शवला आहे.

वजिराबाद रस्त्यावरील भजनपुरा येथील मार्गावर बांधलेले हनुमान मंदिर आणि ‘बीच रोड’वर बांधलेली चांद बाबाची मजार (मुसलमानाचे थडगे) काही दिवसांपूर्वी प्रशासनाने हटवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र विरोधामुळे कारवाई होऊ शकली नाही.