All teachers in the state now have a 'dress code' - Education Minister Deepak Kesarkar
All teachers in the state now have a 'dress code' - Education Minister Deepak Kesarkar

मुंबई – आगामी शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांना ड्रेसकोड बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा, याबाबत शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार / चुडीदार, कुर्ता तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट परिधान करावी. जीन्स, टी-शर्ट , नक्षीकाम असलेले शर्ट नको, असे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

विद्यार्थ्यां प्रमाणे आता शिक्षकांना सुद्धा ‘ड्रेसकोड’ असणार आहे. याशिवाय, सर्व शिक्षकांना आता त्यांच्या नावापुढे टीआर म्हणजे शिक्षक अशी पदवी लावता येणार आहे, जसे डॉक्टरांना डॉ. लावता येते तसा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे. शिक्षकांचे समायोजन करताना नव्या नियमांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. एका कार्यक्रमादरम्यान मुंबईत व लोकप्रतिनिधी यांच्याशी येत बोलत होते.