माद्रिद: करोनाच्या पहिल्या लाटेचा तडाखा सहन केलेल्या स्पेनमध्ये आता करोनाची दुसरी लाट आली आहे. करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी संचारबंदी आणि आणीबाणी लागू करण्यात आली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी घोषणा केली. स्पेनमध्ये रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचार बंदी असणार आहे. तर, आणीबाणी मे महिन्यापर्यंत असणार आहे.

स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी सांगितले की, आणीबाणी च्या निर्णयातंर्गत स्थानिक प्रशासन विविध क्षेत्रातील नागरिकांना इतर ठिकाणी, राज्यात ये-जा करण्यास निर्बंध लादू शकतात. त्याशिवाय नवीन नियमांची कालमर्यादा सहा महिने करण्याचा प्रस्ताव संसदेसमोर मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या नियमांची कालमर्यादा १५ दिवसांची आहे. या वर्षाच्या सुरुवातीला युरोपमध्ये इटली नंतर स्पेनमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावला होता. करोनाच्या पहिल्या लाटेत स्पेनमधील परिस्थिती चिंताजनक झाली होती. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलडमडली होती. करोनाच्या संसर्गाला नियंत्रित आणण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. १५ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन २१ जून रोजी मागे घेण्यात आला होता.

सौजन्य – महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी – इथे क्लिक करा