
मुंबई – महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रीपासून अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत असून, (Mumbai Rain) मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत झाली आहे. संततधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे, त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत सीएसएमटीहून खाली आणि वर जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन डोंबिवली रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान रेल्वे सेवा आधीच बंद करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे दुरुस्तीच्या कामातही अडथळा निर्माण झाला आहे. बदलापूर शहरात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. रस्त्यांनी नद्यांचे रूप धारण केले. अनेक विद्यार्थी रस्त्याच्या पलीकडे अडकले होते, त्यांना स्थानिकांनी दोरीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले.