News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई, (वार्ता) – जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १,६८० नागरिकांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राशी संपर्क साधला आहे. यातील बहुतांश नागरिक आता महाराष्ट्रात सुरक्षित परतले आहेत.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन विशेष विमानांद्वारे एकूण १८४ नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत. याशिवाय, आणखी २३२ नागरिकांना घेऊन इंडिगोचे तिसरे विशेष विमान २५ एप्रिल रोजी श्रीनगरहून मुंबईकडे रवाना झाले आहे.

राज्य शासनाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व मदत आणि व्यवस्था करण्यात येत आहे.