Maharashtra Navnirman Sena
Maharashtra Navnirman Sena

नाशिक : एकेकाळी मनसेचा (MNS) बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये पक्षाला पुन्हा नवसंजिवनी मिळावी यासाठी मनसे प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने नाशिकला मनसेचा १८ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. वर्धापन दिनाच्या माध्यमातून मनसे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शनिवारी (दि. ९) वर्धापन दिनाच्या माध्यमातून मनसे प्रमुख राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे वर्धापन दिनी नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे राज साहेब व पक्षाचे इतर नेते काय बोलतात याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. त्यासाठी राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असणार आहे. येत्या काही दिवसात लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे मनसेच्या वर्धापन दिनाला महत्व प्राप्त झाले आहे. मनसे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार का ? की भाजपसोबत जात महायुतीत सामील होणार ? याविषयी आज होत असलेल्या मेळाव्यातून राज ठाकरे त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. यावेळी राज साहेब त्यांच्या ठाकरे शैलीत कोणाचा समाचार घेतात हे आज समजेल.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिककरांनी मनसेच्या तीन आम दारांना निवडून दिले होते, त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मनसेचे वर्धापन दिनाला विशेष महत्त्व आहे. मागील दोन दिवसांपासून पक्षाध्यक्ष राज ठाकरे व युवा नेते अमीत ठाकरे नाशकात तळ ठोकून आहे. नाशिक येथे साजरा करण्याचा निर्णय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. नाशिक शहर स्वागत कमानी, फलक, झेंड्यांनी शहर सजले आहे.