News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मोसमी वारे (मान्सून) Monsoon Update मंगळवारी बंगालच्या उपसागराच्या इतर काही भागांसह संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचले. या वर्षी मान्सून सामान्य वेळेच्या दोन दिवस अगोदर (19 मे) बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला.

त्यानंतर मान्सून थांबला. अंदमान समुद्रासह संपूर्ण अंदमान, निकोबार बेटे आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात मंगळवारी मान्सून दाखल झाला आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
अरबी समुद्रातील आगमनाला अनुकूलता असून, दोन दिवसांत मान्सून मालदीव आणि कोमोरोसमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. तसेच अरबी समुद्रात मान्सूनचे आगमन होण्याची चिन्हे आहेत. यंदा 4 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला आहे.