• नाशिक (Nashik) महापालिकेच्या उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभाग, नाशिक रोझ सोसायटी व नाशिक सिटिझन फोरम यांच्या सहकार्याने मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन येथे दि. २४ ते २६ मार्चला आयोजित पुष्पोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २४) अभिनेत्री अर्चना निपाणकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी ‘नृत्य रंगवेध’ हा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. पुष्पोत्सव आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ४० सायकलस्वारांनी रॅलीत सहभाग घेतला होता. शहरातील फुलबाजार येथील गाडगे महाराज पुलाजवळ सायकलस्वार जमले होते.
  • नाशिककरांनी या पुष्प प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. 25 मार्चला ‘स्वर सुगंध’ हा सुगम व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी अभिनेता चिन्मय उदगीरकर, किरण भालेराव उपस्थित राहणार आहेत. 26 मार्चला विजेत्यांना ट्रॉफिजचे वितरण हास्य अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या हस्ते होणार आहे.