देशात दिवसभरात कोरोनाचे (corona)३ सहस्र रुग्ण आढळले असून मागील १८४ दिवसांतील हा उच्चांक आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ सहस्र ३८९ एवढी झाली आहे. २ एप्रिल या दिवशी केरळ, राजस्थान, देहली आणि हरियाणा या राज्यांत प्रत्येकी १ रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडला. सद्यःस्थितीत केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांत कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत. केरळमध्ये ४ सहस्र ९५३ रुग्ण असून महाराष्ट्रात ३ सहस्र ३२४ रुग्ण आहेत.

देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शनिवारी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 416 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर संसर्ग दर 14.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या सात महिन्यांतील एका दिवसातील ही सर्वाधिक प्रकरणे आहेत. राज्यात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2,506 इतकी असून गेल्या 24 तासांत 317 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करून भारतात दाखल होणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी अद्यापही राज्यात सुरुच आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळांवर दाखल होणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे.