मुंबई – पुणे येथील राजगुरुनगर येथे हुतात्‍मा क्रांतीकारक शिवराम हरि राजगुरु यांच्‍या जन्‍मस्‍थानी त्‍यांचे भव्‍य स्‍मारक उभारण्‍यात येणार आहे. राज्‍यशासानाच्‍या सांस्‍कृतिक विभागाकडून स्‍मारकाचा आराखडा सिद्ध करण्‍यात आला आहे. या आराखडा अंतिम करण्‍यासाठी १ जुलै या दिवशी शासनाच्‍या वतीने राजगुरुनगर येथे एक बैठक आयोजित केली आहे.

ही बैठक केवळ निमंत्रितांसाठी आहे. सांस्‍कृतिक विभागाकडून या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांसह पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री, स्‍थानिक लोकप्रतिनिधी, पुरातत्‍व विभागाचे अधिकारी, आराखडा समितीचे सदस्‍य यांना निमंत्रित करण्‍यात आले आहे.

Image courtesy – India Today