News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. ऑगस्ट 2022मध्ये शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 -9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या 15 मे नंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनीही या मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दिला आहे.

त्यामुळे यावेळी हा मंत्रिमंडळ विस्तार नक्की होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.