नाशिक – भारत निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नाशिक लोकसभा मतदार संघात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. या दिवशी मतदारांची ओळख पटविण्याकरीता निवडणूक ओळखपत्रा व्यतिरिक्त विविध १२ प्रकारचे कागदपत्रे आयोगाने अधिसूचित केले आहेत
१. आधार कार्ड
२. मनरेगा जॉब कार्ड
३. बैंक पोष्टाद्वारे जारी केलेले फोटोसह असलेलेपासबुक
४. श्रम मंत्रालय योजने अंतर्गत जारी केलेले विमा स्मार्ट कार्ड
५. ड्रायव्हींग लायसन्स
६. पॅनकार्ड
७ एमपीआर अंतर्गत आरजीआई द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड
८. भारतीय पासपोर्ट
९ फोटोसह पेंशन दस्तावेज
१०. केइ राज्य सरकार / लोक उपक्रम / पब्लिकलि. कंपनीद्वारे कर्मचारी यांना जारी केलेले फोटोसह ओळखपत्र
११. सांसद / विधायक / विधान परिषद सदस्य यांचे करिता जारी 1234 1234 1234 मेरा आधार मेरी पहचान केलेले ओळखपत्र
१२. भारत सरकारच्या सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे अपंगत्वाचे कार्ड (यूनिक डिसएबिलीटी आय डी)
वरील पैकी कोणतेही एक ओळखपत्र / कागदपत्र निवडणुकीसाठी ओळख म्हणून चालणार आहे. मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जातांना वरीलपैकी कोणतेही एक कागदपत्र घेऊन मतदान करण्यासाठी यावे असे आव्हाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.