मुंबई : पशुसंवर्धन विभागात अनेक ४४६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. लम्पी आजाराच्या संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे विखे पाटील यांनी आवश्यक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाची पदभरती जाहीर करण्यात आली आहे.
त्या अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. २७ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११ जून २०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. या भरतीसाठी परिक्षा जुलै महिन्यात होणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
जाहिरात पहा