Nitin Gadkari feels dizzy during speech
Nitin Gadkari feels dizzy during speech

यवतमाळ – नितीन गडकरी यांनी स्टेजवर भाषण करताना भोवळ आल्याची घटना घडली. भरसभेत भाषण करत असताना हा प्रकार घडला. यवतमाळच्या पुसद येथील जाहीर सभेदरम्यान ही घटना घडली आहे. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. यवतमाळमध्ये महायुतीच्या जाहीर सभेत भाषण सुरु असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. यावेळी उपस्थितांनी त्यांना सावरलं.

आज राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसदच्या शिवाजी ग्राऊंडवर महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाषणाला उभे राहिलेल्या गडकरींना भोवळ आली. यावेळी त्यांच्या अंगरक्षकाने आणि मंचावरील इतर उपस्थितांनी त्यांना सावरलं.

नितीन गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असून. काही क्षणांच्या विश्रांतीनंतर व औषधो उपचारानंतर नितीन गडकरी यांनी भाषणाला पुन्हा सुरुवात केली.