नाशिक : करोनाबाधितांचा आकडा वाढू लागल्यानंतर नाशिकमधील पर्यटनस्थळे बंद करण्यात आली होती. मात्र, आजच्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पर्यटनस्थळावरील निर्बंध उठविण्यात येत असल्याची घोषणा केली. रुग्णसंख्या ३ हजाराने रुग्णसंख्या घटली असून पॉझिटिव्हिटी रेट २७ टक्क्यांवर आला आहे. तसेच म्युकरमायकोसिस एकही रुग्ण नाशिक शहरात नाही.
शाळाही सुरू झालेल्या असून कुठेही मुले बाधित झालेले नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील करोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्हातील पर्यटन पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी पावले उचलली जात असून करोना नियमांचे पालन करत पर्यटनस्थळावरील निर्बंध उठविण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री भुजबळ यांनी केली.