News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नाशिक – नाशिकजवळ एक सुखोई विमान कोसळले. या दुर्घटनेत दोन पायलट जखमी झाले असून वैमानिकाने पॅराशूटच्या साहाय्याने स्वतःचा बचाव केल्यामुळे दोन्ही वैमानिक थोडक्यात बचावले आहे. विमानाच्या आगीत असलेल्या दृश्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही घटना निफाड तालुक्यातील शिरसगाव परिसरात घडली. ज्या शेतकऱ्याच्या शेतात हे विमान कोसळले त्या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

माहिती मिळताच निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट जाऊन पाहणी केली. तसेच वैमानिकांची विचारपूस केली.