News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

‘प्रतिदिन सकाळी अमुक अमुक रस प्‍या’, ‘लिंबू पाणी प्‍या’ यांसारखे संदेश सामाजिक प्रसारमाध्‍यमांतून आयुर्वेदाच्‍या नावाखाली प्रसारित होत असतात. बरेच जण असे करतही असतात. ‘हे आयुर्वेदिक उपचार आहेत. यांनी काही अपाय होणार नाही’, असे त्‍यांना वाटत असते. येथे एक लक्षात घ्‍यावे की, आयुर्वेदात ‘कारण नसतांना अमुक एक औषध प्रतिदिन घ्‍या’, असे कुठेही सांगितलेले नाही.

शरिरातील अग्‍नी (पचनशक्‍ती) तयार नसतांना काहीही खाल्ले, तरी ते आज ना उद्या अपायकारक ठरते. मग तो कोणता औषधी रस असो किंवा निवळ पाणी असो. त्‍यामुळे सामाजिक प्रसारमाध्‍यमांतील संदेशांनुसार प्रतिदिन सकाळी भरपूर पाणी पिणे, लिंबाचा रस आणि मध घेणे, अमुक अमुक रस घेणे, अशा गोष्‍टी टाळाव्‍यात.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम