भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रमण्‍यम् स्‍वामी (Dr. Subramaniam Swamy) माऊलींच्‍या वारी सोहळ्‍यात सहभागी !

11

पुणे – भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रमण्‍यम् स्‍वामी (Dr. Subramaniam Swamy) हे १५ जून या दिवशी पुण्‍यातील पालखी सोहळ्‍यात सहभागी झाले. डॉ. सुब्रमण्‍यम् स्‍वामी हे पुरंदरमध्‍ये आले होते. या वेळी सासवड येथे एका दिंडीमध्‍ये सहभाग घेत टाळ-मृदंगाच्‍या तालावर त्‍यांनी ठेका धरला. या वेळी त्‍यांच्‍या समवेत पुरंदरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे हेही उपस्‍थित होते. सासवडमध्‍ये माऊलींची पालखी ज्‍या ठिकाणी विसाव्‍याला थांबली होती, तिथे राष्‍ट्रवादीच्‍या खासदार सुप्रिया सुळेही उपस्‍थित होत्‍या. या वेळी सुब्रमण्‍यम् स्‍वामी आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली. दोघांमध्‍ये काही काळासाठी चर्चाही झाली.

सौजन्य – ABP माझा

यानंतर त्‍यांनी पालखीतळावर जाऊन माऊलींच्‍या पालखीचे दर्शनही घेतले. ज्‍या ठिकाणी संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्‍या पालखीचा विसावा आहे. त्‍या विसाव्‍याच्‍या स्‍थळाला त्‍यांनी भेट दिली. तिथे काही काळ त्‍यांनी वारकर्‍यांसह घालवला. या वेळी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्‍याविषयीची त्‍यांनी माहिती घेतली.