कोरोना विषाणूला हद्दपार करण्याची प्रतिज्ञा घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद द्विगुणित करूया असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केलं आहे.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्याग आणि समर्पणाची परिसीमा करणाऱ्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना त्यांनी अभिवादन केल. राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांतून विविध संस्था, संघटनांनी ऑगस्टक्रांतीदिनानिमित्त स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करणार्यात वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू होत असतानाचा हा क्रातीदिन सोहळा कोरोनाच्या सावटामुळे साधेपणानंच साजरा करावा लागला.