राज्यात शाळा चालू न करता महाविद्यालये चालू करावीत ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

40

जालना – राज्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली नसली, तरी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात अल्प झाली आहे. याच कारणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन शाळा चालू करण्याविषयी चर्चा करण्यात येत आहे; मात्र याविषयी १२ जुलै या दिवशी आरोग्यमंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, सध्या शाळा चालू करू नये. १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महाविद्यालये चालू करण्यास हरकत नाही.

Source – Dainik Sanatan Praphat