News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

जळगाव – नागपूर, अमरावती, अहिल्यानगर (अहमदनगर) यांनंतर आता जळगाव जिल्ह्यातील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत ३१ मे या दिवशी झालेल्या बैठकीनंतर जळगावमधील यावल येथील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर, पारोळा येथील प्रसिद्ध श्री बालाजी मंदिर यांच्यासह अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला.

त्यासंदर्भात यापूर्वीच वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेल्या श्री ओंकारेश्‍वर मंदिर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ५ जून या दिवशी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये श्री बालाजी मंदिर (पारोळा), श्री मनुदेवी मंदिर (यावल), श्री पद्मालय देवस्थान (एरंडोल) या मंदिरांसह ३० हून अधिक मंदिरांत येत्या आठवड्यात, तर जळगाव जिल्ह्यातील अन्य मंदिरांमध्ये येत्या ३ मासांत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषित करण्यात आले. ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी या वेळी सर्वांना संबोधित केले.

वस्त्रसंहिता लागू होणार असलेली मंदिरे !
१. श्री ओंकारेश्‍वर मंदिर, जळगाव
२. श्री बालाजी मंदिर, पारोळा
३. महर्षि व्यास मंदिर, यावल
४. श्री पद्मालय देवस्थान, एरंडोल
५. कष्टभंजन देव हनुमानजी मंदिर, सूनसावखेडा
६. सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर, यावल
७. श्रीराममंदिर, पारोळा
८. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पिंपरी, जामनेर
९. श्री मारुति मंदिर, प्रजापतीनगर, जळगाव
१०. पंचमुखी मारुती मंदिर, जळगाव
११. श्री शनी मंदिर, सिंधी कॉलनी, जळगाव
१२. दक्षिणमुखी मारुति मंदिर, गोलानी मार्केट, जळगाव
१३. उमा महेश्‍वर मंदिर, उमाळे, ता.जि. जळगाव
१४. शिवधाम मंदिर, जळगाव
१५. इच्छादेवी मंदिर, जळगाव
१६. कालिंकामाता मंदिर, जळगाव
१७. सूर्यमुखी हनुमान मंदिर, विवेकानंद नगर, जळगाव
१८. अष्टभुजा मंदिर, भुसावळ
१९. स्वयंभू श्री मुजुमदार गणपति मंदिर, चोपडा
२०. हरेश्‍वर महादेव मंदिर, चोपडा
२१. बालवीर हनुमान मंदिर, चोपडा
२२. नवग्रह मंदिर, शेतपुरा, चोपडा
२३. श्री वरद विनायक मंदिर, प्रेमनगर, जळगाव
२४. श्री गजानन महाराज मंदिर, बांभोरी
२५. सातपुडा निवासिनी श्री भवानीमाता मंदिर, कुसुम्बा, रावेर
२६. श्री साई मंदिर, तुळसाई नगर, जळगाव

यांसह दसनूर येथील मंदिर, पाचोरा येथील २ मंदिरे आणि भादली येथील ६ मंदिरे, येथे वस्त्रसंहिता लागू होणार आहे.