Home India १० वर्षांच्या श्रवण सिंहला ‘प्रधानमंत्री बाल पुरस्कार २०२६’ प्रदान, देशभक्तीचा प्रेरणादायी आदर्श

१० वर्षांच्या श्रवण सिंहला ‘प्रधानमंत्री बाल पुरस्कार २०२६’ प्रदान, देशभक्तीचा प्रेरणादायी आदर्श

9

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील ममदोत गावातील १० वर्षीय श्रवण सिंह याने दाखवलेल्या शौर्यामुळे संपूर्ण देश भारावून गेला आहे. भारतीय सैन्याला मदत केल्याबद्दल त्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बाल पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.

ममदोत हे गाव आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. मे २०२५ मध्ये सीमेपलीकडून सातत्याने होणाऱ्या गोळीबारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत सैन्यदलाची अतिरिक्त तुकडी येथे तैनात करण्यात आली होती.

या काळात प्रचंड उन्हाळा, धोका आणि तणाव असूनही श्रवण रोज सैनिकांसाठी पाणी, चहा, दूध, लस्सी, फळांचा रस व बर्फ घेऊन जात असे. त्याच्या सेवाभावामुळे सैनिकांनाही मोठा आधार मिळत होता.

त्याच्या धैर्याने प्रभावित होऊन वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी त्याचे विशेष कौतुक केले आणि त्याला “ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा” ही उपाधी दिली. लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कातियार आणि मेजर जनरल रणजित सिंह मनराल यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रवणने सांगितले की, मोठा झाल्यावर सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करणे हेच त्याचे स्वप्न आहे.