News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस  पडत आहे. या पावसामुळं पाणी साचायला सुरुवात झाली आहे. वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटांनी उशीरा सुरु आहे. तर हार्बर मार्गावरील लोकल 15 मिनीटाने तसेच पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनीट उशिराने सुरु आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अंधेरीच्या सबवेमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे अंधरेी सबवे प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवेच्या दोन्ही बाजूला ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.