India and Sri Lanka to Prepare for Building a Bridge
India and Sri Lanka to Prepare for Building a Bridge

कोलंबो – भारत आणि श्रीलंका यांना जोडण्यासाठी सागरी सेतू बांधण्याची सिद्धता चालू आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितले की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील प्रस्तावित ‘भू-लिंक’ संदर्भात अभ्यास अंतिम टप्प्यात आहे. या आठवड्यात भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर श्रीलंका दौर्‍यावर येणार असून त्यावेळी याविषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

रानिल विक्रमसिंघे म्हणाले की, मंत्र्यांच्या भेटीच्या वेळी भारताला अतिरिक्त ऊर्जा विकण्याच्या व्यावसायिक उपक्रमावरही चर्चा केली जाईल. जुलै २०२३ मध्ये भारतभेटीच्या वेळी विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमध्ये बांधण्यात येणार्‍या पुलाच्या विकासावर चर्चा केली होती.भारत आणि श्रीलंका यांच्यात पूल बांधला गेला, तर रामायण काळानंतर प्रथमच दोन देशांना जोडणारा हा पूल असेल. रामायणाच्या वेळी भगवान श्रीरामाने श्रीलंकेला जाण्यासाठी समुद्रावर एक पूल बांधल्याचे वर्णन आहे, ज्याला ‘रामसेतू ’ म्हणून ओळखले जाते.