आधुनिक दुग्धव्यवसायातील समृद्धीचा कालमंत्र

26

गेल्या दहा वर्षात भारतातील  दुग्धव्यवसायात एक झपाट्याने वाढ झाली आहे. अत्याधुनिक साधने व  उच्च प्रतीच्या गायीच्या जातींसह हजारो नविन  दुग्ध व्यवसाय सुरु झाले आहेत. तथापि अर्ध्या पेक्षाही कमी दूध व्यवसाय दीर्घ काळ टिकाव धरू शकले आहे. कालवडींचे संगोपन, वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध हे आर्थिक दृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसाय करण्यासाठी खूप महत्वाचे आहे.  हा लेख अनेक नवीन दुग्ध व्यवसायिकांना अपयशी होण्याची कारणे आणि त्याचे भविष्यात योग्य नियोजन आर्थिक दृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसाय कसा करावा याविषयी माहिती देणार आहे.

दुग्धव्यवसायाचेज्ञान

ज्या लोकांनी अलीकडील काळात दुग्धव्यवसायामध्ये आपला कल दाखवला आहे ते प्रामुख्याने चार गटात विभागले आहेत. पहिले, स्थानिक लोक की जे  आर्थिक दृष्टया बळकट होण्यासाठी नवीन दुग्धव्यवसायाकडे बघतात. दुसरे, ते लोक की जे भारताबाहेरील आहे आणि त्यांचे अतिरिक्त उत्पन्न ते  शेतीउद्योगात गुंतवू इच्छितात. तिसरे गट हा  शहरी शिक्षित तरुणांचा असून जे त्यांच्या रोजच्या कामात असमाधानी आहेत  व ते त्यांच्या शेती या  मुळ व्यवसायाकडे परत येऊ इच्छितात. शेवटी चौथा गट म्हणजे सुशिक्षित पण काम नसलेले उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण की जे व्यवसाय शोधात असतात.

यापैकी कुठल्याही गटातील लोकांना दुग्धव्यवसायातील प्रत्यक्ष अनुभव नाहीये किंवा जे पण करत आहे ते पारंपरिक पद्दतीने करण्याचा पर्यत्न करत आहे. आणि जर तुम्हाला गायींबद्दल आवश्यक माहिती किंवा अनुभव नसेल तर आधुनिक तंत्रज्ञान व साधने यांचे ज्ञान चिरकाळ टिकत नाहीत तसेच दुग्ध व्यवसाय आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही.

दुग्धव्यवसायएकउपजीविका  –

दुग्ध व्यवसाय हा इतर शेती पूरक व्यवसाया सारखाच आहे, परंतु तो फक्त एक व्यवसाय नसून ते एक उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यासाठी ज्ञान, सहनशीलता, आवड आणि एक चांगली पदवी आवश्यक आहे. अनेक दुग्ध व्यावसायिक हे विसरतात की त्यांचा संबंध हा एका मशीनशी नसून तो जिवंत जनावरांशी आहे. प्रकल्प व्यवस्थापन आणि अत्याधुनिक उपकरणांचा ज्ञान हे दुग्ध व्यवसायासाठी मदत करते परंतु तेवढे असून चालत नाही.

मोठ्यापरिणामांसाठीछोटीसुरुवात –

अनेक दुग्ध व्यावसायिक ही चूक करतात की ते दुग्ध व्यवसायातील इथंभूत माहिती न घेता मोठे, अत्याधुनिक व जास्त जनावरे  असलेली  गोठे चालू करतात. ते सुरुवातीलाच भव्य गोठ्याचे बांधकाम करतात आणि जास्त प्रमाणात जनावरे खरेदी करतात. मित्रांनो जेव्हा तुम्ही दुग्ध व्यवसायात नवीन असतात आणि एक मोठा गोठा असेल तर त्यातील समस्या दूर करणे आपल्याला फार कठीण जाते. त्यासाठी सर्व एकाच वेळी जनावरे खरेदी करण्यापेक्षा ते टप्प्याटप्प्याने खरेदी करावे म्हणजे मासिक दूध उत्पादनामध्ये  सातत्य टिकून राहील.

जनावरांचीप्रजननक्षमतासमजूनघ्या –

अनेक नवीन दुग्ध व्यावसायिक आपल्या गाईंचा जीवनक्रम समजून घेण्यापेक्षा ते पूर्णपणे आपले लक्ष दूध आणि दूध प्रक्रिया याकडे केंद्रित करतात. वर्षाला एक वेत मिळवण्यासाठी  गाय विण्यापूर्वी व विल्यानंतर योग्य आहार व्यवस्थापन  करणे, जनावरांचा माज ओळखणे तसेच विल्यानंतर जास्तीत जास्त चार महिन्यांत गाभण राहिली याची माहिती आज बऱ्याश्या शेतकऱ्यांना नाही आहे. आज बाजारात संक्रमण काळातील व्यवस्थापनासाठी तसेच जनावरांचा माज ओळखण्यासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून आपण आपल्या गोठ्यामध्ये जनावरांचा योग्य माज योग्यवेळी ओळखू शकता आणि आपल्या जनावरांना गाभ घालू शकता. त्यामुळे दुधाचे आणि आहाराचे होणारे नुकसान आपण टाळू शकतो.

वासराचीकाळजी –

वासरांच्या अयोग्य काळजीमुळे अनेक दुग्ध व्यावसायिक आपल्या धंद्यामध्ये अपयशी होतात. अनेक गोठ्यामध्ये अशी समस्या असते की दूध देणाऱ्या 100 पेक्षा जास्त गायी असतात पण २० ते २५ वासरे कालवडींच्या टप्प्यामध्ये प्रवेश करतात. दीर्घकालीन आर्थिक दृष्ट्या सक्षम दुग्धव्यवसाय करण्यासाठी वासरांची योग्य व्यवस्थापन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात कालवडी या दुग्ध व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाच्या आहे कारण त्यांचे योग्य केल्यास  त्या पुढे जाऊन दोन  वर्षात दूध देऊ शकतात.

चाराव्यवस्थापन –

दूध देण्याच्या पहिल्या टप्प्यात अनेक शेतकरी चांगल पशुखाद्य, वाळलेला चारा व ओला चारा तसेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स  आपल्या पशूंना देतात. तथापि जेव्हा पाच ते सहा महिन्यानंतर दूध कमी द्यायला लागतात आणि विण्यापूर्वी आटवल्या जातात तेव्हा ते जनावरांचा आहार कमी करतात आणि कधीकधी तर अर्ध्यापेक्षा कमी देतात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच योग्य व्यवस्थापन करत नाही. परंतु जनावरांचा आहार हा त्यांच्या दूध उत्पादनानुसार तसेच त्यांच्या वजनाच्या गरजेप्रमाणे त्यांना दिला गेला पाहिजे. तो कुठलाही अनावश्यक कारणांमुळे कमी करू नये. कुठल्याही प्रकारे आहारातील असंतुलित पणा किंवा असमतोल याचा जनावरांचे आरोग्य आणि प्रजनन क्षमता यावर घातक परिणाम करतात. 

अत्याधुनिकउपकरणेआणिकामगार

अनेक नवीन दुग्ध व्यवसायिकांना असे वाटते की आपला गोठा हा अत्याधुनिक असावा. परंतु हाताने दूध काढणे ते यंत्रणेने दूध काढणे हे चुकांमधून शिकणे अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे यात वेळ आणि संयम हे खूप आवश्यक आहे. जेव्हा ते अचानक काम करत नाही तेव्हा शेतकरी ते वापरायला पूर्णपणे बंद करतात किंवा त्याचा त्याग करतात त्यासाठी आडकवलेला प्रचंड पैसा वाया जातो. त्यात कोणतीही सूचना न देता अचानक कामगार राजीनामा देतो किंवा सोडून जातो हे सुद्धा एक दया येण्या सारखाच आहे. अत्याधुनिक उपकरणे आणि कामगार यात समतोल राखणे हीच दीर्घकालीन यशस्वी दुग्ध व्यवसायाची गुरुकिल्ली आहे.

स्वतःउपस्थितराहणे –

अनेक नवीन दुग्ध व्यावसायिक शेतकरी आपल्या गोठ्यात स्वतः उपस्थित राहत नाही. आणि गोठ्यातील दैनंदिन कामासाठी ते इतरांवर अवलंबून असतात.  परंतु दुग्धव्यवसाय स्थिर रूपाला येईपर्यंत मालकाने त्यावर स्वतः लक्ष दिले पाहिजे. तुम्ही जर व्यवसायात वचनबद्ध नसाल तर दुग्धव्यवसाय तुमच्यासाठी नाही आहे.

दीर्घकालीनबांधिलकी  –

अनेक नवीन दुग्ध व्यवसाय अशा लोकांनी चालू केले आहे ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे ते तोटा सहन करू शकता आणि ते शिक्षित असून त्यांचा मुख्य उत्पन्नाचा मार्ग हा दुसरा व्यवसाय आहे. जेव्हा काही गोष्टी ठीक चालत नाही, आणि दुग्धव्यवसायातील सुरवातीच्या काळात  बऱ्याचदा असे काही घडून येते हि आणि मग  ते थेट दुग्ध व्यवसाय बंद करण्याचा विचार करतात व  जनावरे कत्तलखान्यासाठी पाठवतात.  प्रदीर्घकाळ दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी, सुरुवातीच्या काळातील अनुकूल परिस्थिती ला  त्याच्या ताब्यात घेऊन तिच्यातून पुढे पुढे जाणे व कटिबध्द असणे महत्त्वाचे आहे.  सरळ दुग्ध व्यवसायातून बाहेर पडणे किंवा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणे आपल्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे असते. जर दुग्धव्यवसाय तुम्ही उपजीविकेचे साधन किंवा प्राथमिक जिज्ञासा  म्हणून आपण त्याकडे बघितले तर हे त्यात आवड निर्माण होईल आणि प्रदीर्घ काळ दुग्ध व्यवसाय टिकवण्यासाठी तुम्हाला कायम  प्रेरणा मिळेल.

निष्कर्ष

दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यासाठी वेळ आणि संयम बरेच आवश्यक आहे. हा लेख लिहिण्याचा हेतू हा दुग्धव्यवसाय घेऊन लोकांचे मन फिरवणे नाही. तर शेतकऱ्यांना शिक्षित करून दुग्धव्यवसायातील सामान्य चुका टाळून त्यांना दुग्ध व्यवसायात यशस्वी करणे हा आहे.

डॉ. अमोल आडभाई, Sky Vet Pet Clinic, Nashik

संपर्क: 8805660943