कैरो (इजिप्त) – इजिप्तमध्ये होणार्‍या ‘ब्राइट स्टार’ नावाच्या युद्धाभ्यासामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय वायुसेनेचे ५ ‘मिग-२९’ ही लढाऊ विमाने पाठवली आहेत. याखेरीज ६ ट्रान्सपोर्ट एयरक्राफ्ट आणि विशेष दलांचे सैनिक यांनाही पाठवण्यात आले आहे. २१ दिवस चालणारा हा युद्धाभ्यास २७ ऑगस्ट या दिवशी चालू झाला. या अभ्यासात इजिप्त आणि भारत यांच्यासमवेतच अमेरिका, साऊदी अरेबिया, ग्रीस आणि कतार या देशांचे सैन्यही सहभागी होणार आहे. ‘ब्राइट स्टार’ हा युद्धाभ्यास जगातील सर्वांत मोठ्या आणि जुन्या संयुक्त युद्धाभ्यासांपैकी एक आहे.

या युद्धाभ्यासातून संयुक्त योजना कशी आखायची ? हे शिकण्यासह सदस्य देशांतील रणनैतिक संबंधांमध्येही सुधारणा होऊ शकेल.

गेल्या काही कालावधीत भारत आणि इजिप्त यांच्यातील संबंध पुष्कळ भक्कम झाले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल् सिसी यांनी भारताला भेट दिली होती, तर जून मासात पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौर्‍यावर होते.