देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सलाम करण्यासाठी एक दीप प्रज्वलित करा – मा. पंतप्रधान

76

नवी दिल्ली : देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सलाम करण्यासाठी एक दीप प्रज्वलित करा, असे भावनिक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दीपावलीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना केले.

जवानांच्या धैर्याबद्दल आपल्या मनातील कृतज्ञतेच्या जाणिवेला शब्द न्याय देऊ शकत नाहीत, जे जवान सीमेवर देशाचे रक्षण करीत आहेत त्यांच्या कुटुंबीयांचेही आपण ऋणी आहोत, असे मोदी म्हणाले. यापूर्वी  मोदी यांनी ‘मन की बात’मधूनही दिवाळीला जवानांसाठी एक दीप प्रज्वलित करण्याचे आवाहन केले होते. भाजपने समाज माध्यमांवर दीप प्रज्वलित करतानाचे छायाचित्र टाकण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून मोदी हे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू-काश्मीर आदी सीमावर्ती प्रदेशांत जवानांसमवेत दिवाळी साजरी करतात.

संदर्भ व अधिक माहिती – लोकसत्ता