बृहस्पति हा ईशान्य दिशेचा स्वामी आहे, ज्याला ‘ईशान कोना’सुद्धा म्हटले जाते. ईशान ईश्वर किंवा देव आहे. अशाप्रकारे ही देवाची / गुरूंची दिशा आहे. म्हणून तेथे देवघर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. घराच्या या भागात देवळाचे स्थान जसे आहे, ते संपूर्ण घराची ऊर्जा त्या दिशेने खेचते आणि पुढे घेऊन जाते, घराच्या मध्यभागी ठेवलेले एक मंदिर, ज्याला ब्रह्मस्थान म्हटले जाते. ते शुभकारक आहे आणि यामुळे रहिवाशांना समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळू शकते.

देवघर बनवतांना ते थेट फरशीवर ठेवू नये. देवघर संगमरवरी किंवा लाकडाचे बनलेले असावे. काचेपासून बनलेली देवघरे टाळा. देवघर कोठे आहे हे यापेक्षा तेथे नियमितची पूजा-अर्चा भावपूर्ण होते ना, हेसुद्धा महत्त्वाचे असते. कुटुंबासाठी एकत्र बसून प्रार्थना करण्यास पुरेशी जागा आहे ना, याची निश्चिती करावी. देवघराच्या क्षेत्रात उर्जेचा चांगला आणि निरोगी प्रवाह असावा. ते नेहमी स्वच्छ ठेवावे. आपल्याला देवघरातून शांतता लाभणे सर्वांत महत्वाचे आहे. सध्या जागेच्या समस्येमुळे महानगरांमध्ये देवघरासाठी स्वतंत्र खोली शक्य नसते. अशा घरांसाठी भिंतीवर चढलेल्या देवघरांचा विचार करू शकता.

संदर्भ व अधिक माहिती – सनातन संस्था संकेतस्थळ