अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये भूकंपाचे धक्के, ४.३ रिश्टर स्केलने पृथ्वी हादरली

1

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 8.14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटेची वेळ असल्याने लोक नुकतेच झोपेतून उठत असतानाच भूकंपाचे धक्के बसल्याने लोक घराबाहेर पळू लागले.

आतापर्यंत जी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र भूकंपामुळे लोक घाबरले आहेत.