मुंबईतला कोरोना रूग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीनं पहिल्यांदाचं शंभर दिवसांचा टप्पा ओलांडला

67

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पहिल्यांदाच शंभर दिवसांच्या पुढे गेला असून रुग्ण वाढीचा वेगही मंदावला आहे, असं महानगरपालिकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

चेझ द व्हायरस, मिशन झिरो, फोर टी- अर्थात ट्रेसिंग, ट्रॅकिंग , टेस्टिंग, ट्रीटिंग या चतुःसुत्रीनुसार केलेली कार्यवाही, तसंच माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत बहुस्तरीय पडताळणी या सर्व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना चांगलं यश मिळत असून,

महापालिकेच्या परिश्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.

Source – newsonair.com