मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 या वर्षाकरता अर्थसंकल्प (Budget) सादर केले. या अर्थसंकल्पामध्ये विविध घोषणा करण्यात आल्या.

Maharashtra Budget 2023
  • मराठी भाषा आणि मनोरंजन क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या. यामध्ये श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ , विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे करण्याची घोषणा केली.
  • सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी, गोरेगाव आणि कोल्हापूर चित्रनगरीसाठी 115 कोटी, विदर्भ साहित्य संघाला 10 कोटी रुपयांची घोषणा.
  • अर्थसंकल्पात शिक्षणसेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांचं मानधन 6000 वरुन 16,000 रुपये करण्यात आले आहे. तर माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात 8000 वरुन 18,000 रुपये करण्यात आले आहे.
  • राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार.
  • जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे.
  • राज्यातील 100 बस स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार.
  • पुरंदर या ठिकाणी नवीन विमानतळ बांधण्यात येणार तसेच शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल बांधण्यात येणार आहे.
  • महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट.
  • राज्यभरातील स्मारकांसाठी महत्त्वाच्या तरतूदी.
  • भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ ज्योर्तिंलिंग आणि प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपये.
  • राज्यातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा.
  • अंगणवाडी सेविका, आशा, मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ.
  • देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करणार.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील उपचार मर्यादा पाच लाखांवर.
  • राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येणार.
  • 3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार.
  • विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोफत गणवेशही मिळणार आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये.
  • मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार होणार.

विरोधकांची टीका.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांची सुकाळ असणार हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  •